वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानोजा परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. हवामानातील बदल व इतर नैसर्गिक कारणांमुळे यावर्षी संत्रा झाडांना बहरच न आल्याने सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे संपूर्ण उत्पादन हातातून गेले आहे.