वाशिम जिल्ह्यात तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईचा फटका आता फळबागांनाही बसू लागला आहे. मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील शेतकरी विजय इंगोले यांनी अडीच एकर क्षेत्रात ५५० संत्रा झाडांची लागवड करून मोठ्या मेहनतीने फळबाग उभी केली होती.