परभणीत शेतकऱ्यांना दररोज शेती मशागतीच्या कामासाठी 100 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत. पूर्व मशागत आणि शेती कामांची अडचण बघता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुरवठा विभागाने आदेश दिले आहेत. पेट्रोल पंपावर आधार कार्ड सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना शंभर लिटरपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश आहेत.