बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे हनुमान जन्मोत्सव आणि सय्यद हसन सहाब यांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झालीये. यात्रेनिमित्त हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून येते. शेकडो वर्षांपासून हिंदू मुस्लिम समाज बांधव एकत्र येत यात्रेत सहभागी होतात. या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फड रंगल्याचं पहायला मिळालं.