बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने आज जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील कपाशी लागवडीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. कपाशी लागवडीला शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार जवळपास पंधरा दिवस उशीर झाला असून यामुळे यावर्षी कपाशी उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.