धुळे जिल्ह्यातील 182 पेट्रोल पंपापैकी नऊ पेट्रोल पंपावरील डिझेल साठा संपला आहे, उर्वरित पेट्रोल पंपावर साठा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक चालकांची डिझेल घेण्यासाठी गर्दी केली आहे. लळींग गावालगत असलेल्या पंपावर पर प्रांतातील ट्रक चालकांनी गर्दी केली आहे. मात्र त्यांना अवघं 100 लिटरच डिझेल दिलं जात आहे.