सप्तशृंगीदेवी माता, चरणी ठाव देई आता...' अशा भक्तिमय सुरावली आणि आदिशक्तीच्या जयघोषात सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला. चैत्र पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर एक लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.