जळगाव जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने चाळीसगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यावर अक्षरशः नांगर फिरवला आहे. यावेळी केवळ उभी पिकेच नाही, तर शेतीची सुपीक मातीच वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत भविष्याबद्दलची भीती स्पष्ट दिसून येत आहे.