सध्या राज्यात घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. अशातच नित्य नियमाने जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक इथले 900 पुरुष 600 महिला असे जवळपास अंदाजे पंधराशे वारकरी चार दिवसांचा 105 किलोमीटरचा प्रवास करत गॅसच्या तुटवड्यावर मात करत शेगावात दाखल झाले आहेत. त्यांनी सोबत असलेल्या लाकडी इंधनावर स्वयंपाक केला, त्यामुळे अडचण आली नाही.