तळकोकणात पावसाळ्यात प्रामुख्याने भात शेतीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली. सध्या भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.