गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील धान पिकाची नर्सरी (पर्हे) धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने कोवळी रोपं सुकू लागली असून, ही रोपं वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. अशाच एका भागात, पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्याला दूरवरून बादलीची कावड बनवून पाणी आणावं लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे.