कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन खेडमध्ये उत्साहात पार पडले. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले.यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात करण्यात आली.