उन्हाचा पारा वाढत असल्याने वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील पैनगंगा नदीवरील पाणी पातळी झपाट्याने घटली असून नदीवरील कोल्हापुरी बंधारे काही ठिकाणी पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.