कोल्हापूरच्या उचगाव गावात मंगेश्वर देवाचा पालखी भेट सोहळा पार पडला.. कामदा एकादशीला होणाऱ्या माडीयात्रेची या पालखी भेटीने शोभा वाढवली.. आठ देवांच्या पालखी भेटीचा क्षण अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दाखल झालेले. यात्रेच्या यंदाच्या भेटीमुळे गावातील माहेरवाशिणींचे गारवे धनगरी ढोल, कैताळ, भंडाऱ्याच्या उधळणीतच वाजत गाजत मंगेश्वर देवाला आणलेले.. लाडू , करंजी, भाकरी, वडी, पुरणपोळ्या आणि आठ विविध खाद्यपदार्थांचा या गारव्यामध्ये समावेश होता.. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत यंदाच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केलेली. सायंकाळच्या सुमारास मंगेश्वर मंदिरासमोर पालख्यांचा भेटीचा सोहळा भंडाऱ्यांच्या उधळणीत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. पहिल्यांदाच पालखी सोहळा अनुभवण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती..