'पळसाला पाने तीनच' ही म्हण आपण सर्वांनी ऐकली आहे, पण सध्या या झाडांवर पानांपेक्षा फुलांचीच संख्या अधिक दिसत आहे. धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ला परिसर, नगाव-देवपूरचा भाग आणि ग्रामीण भागातील शेतशिवारात पळसाची झाडे केशरी रंगाने बहरली आहेत.