गोंदिया जिल्ह्यात उन्हाळ्याच्या चाहुलीसोबतच पळसाच्या फुलांचा बहर दिसू लागला आहे. ग्रामीण भागातील शेतशिवार आणि रानावन केसरी रंगाने नटले आहेत. ‘जंगलाची ज्वाला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळसाच्या फुलांनी परिसर आकर्षक बनला असून निसर्गप्रेमींचे लक्ष वेधले आहे. या फुलांमुळे वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.