भटक्या कुत्र्याला वाचवताना रिक्षाचा भीषण अपघात झालाय. सफाळे तांदूळवाडी मार्गावर सफाळे शहरात रिक्षाचा हा अपघात झालाय. अचानक समोर धावत आलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवताना भरधाव रिक्षा पलटी झाली. अपघातात रिक्षा चालकासह रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींवर सफाळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मागील अनेक महिन्यांपासून सफाळे परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत.