पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पालघर तालुक्यातील वाढीव गावातील विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत घेऊन शाळा गाठावी लागत आहे. सुरक्षित रस्ता आणि पूल नसल्याने विद्यार्थ्यांना धावत्या रेल्वे मार्गालगतून आणि रुळांवरून प्रवास करावा लागत आहे.या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी तयार करून थेट पंतप्रधानांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.