कालपासून पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या धरणाचा पाणीसाठा 94 टक्के झाला आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून सूर्या धरणातून 30 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाच्या पाण्यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे.