पालघर : वाडा तालुक्यातील गोऱ्हे फाटा ते देवळी केळीचा पाडा ते मांडा रस्त्यावर ग्रामस्थांनी सकाळी १० वाजता पासून दुपारी तीन वाजे पर्यंत पाच तास रास्ता रोको केला होता. या आंदोलनात मोठ्या संख्येने विध्यार्थी सहभागी झाले होते. खदानीच्या ओव्हरलोड वाहनांनी येथील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने लोकांना रस्त्यावरून कसरत करून प्रवास करावा लागत आहे.अनेक तक्ररी करून प्रशासनाने दखल न घेतल्याने आज ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.