विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी 21 जून रोजी पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे.. 23 जुलै रोजी श्रींची पालखी पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.. त्यानंतर सहा दिवस म्हणजेच पालखीचा 28 जुलै पर्यंत पंढरपुरात मुक्काम राहणार असून आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहे.. श्रींच्या पायदळ वारीचे हे 57 वे वर्ष आहे.. या पायदळ वारीत 700 पेक्षा अधिक पताकाधारी, वारकरी सहभागी होत असतात, जवळपास 800 किलोमीटर पेक्षा जास्त शेगाव ते पंढरपूर तसेच परतीचा पंढरपूर ते शेगाव हा प्रवास ते करत असतात..