केंद्र सरकारकडून पॅनकार्डच्या नियमांमध्ये पाच मोठे बदल प्रस्तावित आहेत. अर्थमंत्रालयाने इन्कम टॅक्स रुल्स 2026 चा मसुदा तयार केला आहे. यानुसार, बँक व्यवहार, वाहन खरेदी, हॉटेल बिले, मालमत्ता खरेदी आणि विमा संरक्षणासाठी पॅनकार्डची अनिवार्यता वाढणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून हे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे.