बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 4 मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देणारा बॅनर पंढरपूरात लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी हा बॅनर लावला आहे.