पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी प्रणिता भालके यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भालके समर्थकांनी माजी आमदार प्रशांत परिचारकांना आव्हान दिले. 'भालके यांच्या नादी लागू नकोस, जेव्हा जेव्हा समोर आला तेव्हा पाडले आहे,' असे एकेरी भाषेत बोलत दंड थोपटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.