पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील हॉटेल राजमुद्रा रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला. येथे बेकायदेशीर देह व्यापार सुरु असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, देहव्यापारात सहभागी असलेल्या पाच पुरुष आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी ही माहिती दिली.