पंढरपुरात पाण्याचं, सांगोला सोन्याचं आणि मंगळवेढा दाण्याचं या म्हणीप्रमाणे प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढ्यातील मालदांडी ज्वारीला यंदा ऐतिहासिक दर मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून मालदांडी ज्वारीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली होती. परिणामी बाजारात ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणात घटली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडधान्य आणि भरड धान्यांचे (मिलेट्स) महत्त्व अधोरेखित केल्यानंतर ज्वारीसारख्या पिकांची मागणी वाढू लागली आहे.