आषाढी वारीसाठी लाखो भाविकांचं स्वागत करण्यास पंढरपूर रेल्वे स्थानक सज्ज झालं आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुमारे चाळीस कोटी रुपयांचा निधी खर्च करून स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. आधुनिक सुविधा, आकर्षक दर्शनी भाग, प्रशस्त प्रवेशद्वार आणि प्रवाशांसाठी विविध सोयींमुळे स्थानकाला नवा आणि आधुनिक लूक मिळाला आहे.