पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरातील ऐतिहासिक श्री बालाजी आणि महालक्ष्मी मंदिरांमध्ये ४ आणि ५ जुलै रोजी नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी मंदिर समितीकडून जोरदार तयारी सुरू असून विविध धार्मिक विधींचे नियोजन करण्यात आले आहे.