पंढरपूरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांनी दर्शन रांगेत स्प्रिंकलर, थंड पिण्याच्या पाण्याची तसेच सरबताची व्यवस्था केली आहे.