पंढरपुरात पुरुषोत्तम आधिक एकादशीच्या निमित्ताने व्हीआयपी दर्शन सुरूच आहे. कुणालाही व्हीआयपी म्हणून सोडले जाते. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असूनही व्हीआयपी दर्शन दिले जाते. विधानसभा सदस्य असणाऱ्या आमच्या सारख्या आमदारांना एक तास वेटिंगवर बसवून ठेवले जाते. याबाबत पुण्याच्या वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.