रामनवमी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाकडी विठ्ठल सभा मंडपाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जवळपास एक टन झेंडू, शेवंती, गुलाब अशा वेगवेगळ्या फुलांचा वापर करून सभा मंडप सजवण्यात आला आहे. याच सभामंडपात दुपारी बारा वाजता रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.