रंगीबेरंगी पंचवीस प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट केली आहे. श्री विठ्ठलाचा,रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच मंदिराच्या सोळ खांबी,चार खांबी अशा विविध भागांना लाल गुलाब, पिवळा गुलाब, शेवंती,कनेर, अष्टर, शेवती, जाई, जुई,सुपारीची फुले अशा देशी विदेशी दोन टन फुलांचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीमध्ये देवाचे मनमोहक रूप अधिकच खुलून दिसत आहे. श्रावण महिन्यातील पहिलीच एकादशी असल्यामुळे हजारोच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.