भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील पगाजी विद्यालय कोलारी येथे शाळा सुरू असताना परिसरात अचानक कोब्रा नाग निघाल्याने तारांबळ उडाली. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी भल्यामोठ्या सापाला बघून घाबरले. नंतर मुख्याध्यापकांनी सर्पमित्र गुंजन हेमने आणि वैभव हेमने यांना साप असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्रांनी त्या कोब्रा सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोकळा श्वास घेतला.