मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आज जनता दरबार घेतला या जनता दरबारामध्ये परळी सह बीड जिल्ह्यातील अनेक नागरिक वेगवेगळे प्रश्न घेऊन दाखल झाले होते यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्वांच्या प्रश्नाचं निराकरण केलं आणि पीडित वंचित आणि न्यायाची मागणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना धीर दिला यावेळी पंकजा मुंडे यांचं पालकत्व देखील पाहायला मिळालं याच जनता दरबारामध्ये आपल्या आईच्या कुशीत बसलेला एक चिमूरडा रडत असताना पंकजा मुंडे यांनी त्याला मायेचा हात दिला.