मंत्री पंकजा मुंडे गेल्या तीन दिवसापासून परळीत मुक्कामी आहेत. याबद्दल त्यांनी म्हटलं आहे की, " माझ्या नगरपालिकेच्या जे काही मुलाखती होत्या त्या दिवाळीच्या आधीच पूर्ण झाल्या आहेत. माझ्याकडे इच्छुकांची पूर्ण यादी ऑलरेडीच आलेली आहे. प्रत्येक नगरपालिकेचा मुंबईतच एक राऊंड झालेला आहे. आणि मी इथेच ठाण मांडून आहे. प्रत्येक कार्यकर्त्याशी मी चर्चा करते यातून जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला ताकद मिळावी असा आम्ही निर्णय घेऊ" असंही त्यांनी म्हटलं आहे.