पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कामोठे परिसरात एका वाहनातून 17 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात अवैध आर्थिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, पुढील पडताळणीसाठी ही रक्कम आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे.