खडकाळ आणि पडीक जमीन चे सपाटीकरण करून आपल्या मेहनतीच्या जोरावर किन्ही महादेव येथील अल्पशिक्षित शेतकऱ्याने लाखोंचे पपई चे उत्पन्न घेतलेय. ह्या शेतकऱ्याने पारंपरिक पिकांबरोबरच खडकाळ जमिनीवर शेती करून पपई ची बाग फुलविली आणि इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केलाय. खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील महेंद्र देशमुख हा 42 वर्षीय शेतकरी फक्त 8 वा वर्ग शिकलेला, मात्र पुढे शिकून काय करावे या विवंचनेत आणि वडिलोपार्जित असलेली शेती संभाळणायसाठी घरी कोणीही नसलायने त्यांनी समोर शिक्षण घेणे थांबविले. खडकाळ शेती असल्याने आणि पिकांना मिळणारा कमी दर, यामुळे शेती परवडत नव्हती, म्हणून मग पारंपारिक पिकांसोबतच त्यांनी आठ एकर शेतीमध्ये पपईची लागवड केलीय. सोबतच त्यात आंतरपीक म्हणून टरबुज, खरबूज पिकांचे लाखोंचे उत्पादन ही घेतले. पपईच्या लागवडीचा त्यांना यापूर्वाचा अनुभव होताच आणि राम पवार या कृषी तज्ञांच्या मार्गदर्शन मुळे महेंद्र देशमुख ह्यांनी हे पाऊल उचलले. शेती माळावर असल्याने दोन किमी वरून पाणी आणले.. पपईची लागवड करून त्याला ठिबक द्वारे पाणी दिले, त्याची सेंद्रीय पद्धतीने मशागत केली.. रासायनिक खतांची किंवा रासायनिक औषधांची कोणतीही फवारणी न करता आज सहा महिन्यांत पपई तोडायला आली आहे. दर आठवड्याला पाच टन पपई तोडणी होत आहे. संपूर्ण पपई तोडणी होईपर्यंत महेंद्र देशमुख यांना 40 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. पारंपरिक पिकांपासून कसलंही उत्पन्न होत नसताना त्यांनी ह्या पिकांना फाटा देत त्यामध्ये नंदनवन फुलविले आणि लाखोंचे उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय. तर प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी फळबाग लावावी, असे आवाहन हि त्यांनी केलेय.