एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले आहे. वाढलेल्या उन्हामुळे बीडच्या परळीत असलेले लघु प्रकल्प, पाझर तलाव कोरडे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे कातकरवाडी येथील लघु प्रकल्प आणि डाबी येथील पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय तर दुसरीकडे खोडवा सावरगाव येथील पाझर तलावाने देखील तळ गाठल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतीसाठी आणि जनावरांसाठी केला जात असल्याने पाऊस पडेपर्यंत परिसरातील पाणी प्रश्न गंभीर झालाय.