जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात “गीतंम एडवेंचर”च्या पॅरामोटरिंग साहसी खेळाचा शुभारंभ केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे पर्यटकांना आता सुमारे ४०० फूट उंचीवरून लोणार सरोवराचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे.यामुळे लोणारच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. गीतंम एडवेंचरचे संचालक सचिन कापुरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या साहसी उपक्रमामुळे पर्यटकांना पॅरामोटरिंगचा थरार अनुभवता येणार आहे.