परंडा तालुक्यातील सिरसाव परिसराला अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सिरसाव येथील शेतकरी शहाजी मिसाळ यांची तब्बल 9 एकर पपईची बाग पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. शेतकरी शहाजी मिसाळ यांनी मोठ्या कष्टाने आणि भांडवल लावून 9 एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती.