परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव परिसरात काल झालेल्या पावसामुळे आडगाव ते धारफाटा जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्याचं काम संथ गतीने सुरु असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. त्या मुळे लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.