परभणीत एटीएम बंद आहेत. कॅश उपलब्ध नसल्याने बँकेकडून अनेक एटीएम बंद करण्यात आले आहेत. तुरळक ठिकाणीच एटीएमवर पैसे उपलब्ध असल्याने एटीएम बाहेर नागरिकांची गर्दी झाली आहे. परभणीत काही एटीएमवर 100 रुपयांच्या नोटा मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कॅश मिळत नसल्याने आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.