परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा 6 अंश सेल्सिअसखाली घसरला आहे. यामुळे शहर आणि परिसरात भीषण थंडीची लाट पसरली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार आहे.