परभणीच्या पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील शेतकरी तुकाराम शिंदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गाईने दोन वासरांना जन्म दिल्याने कुतूहल व्यक्त केले जात आहे. ही दुर्मिळ घटना घडल्याने बघ्याची गर्दी वाढली असून दोन्ही वासरे आणि गाईची प्रकृती चांगली आहे.