सोनपेठ शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत वयोवृद्ध नागरिक आणि महिलांची निराधार पेन्शन आणि किसान योजनेचे अनुदान उचलण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.,जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांवर तासंतास रांगेत ताटकळत उभ राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.