परभणी जिल्ह्यात वाढत्या तापमाना बरोबर ग्रामीण भागात पाणीप्रश्न बिकट होताना दिसून येत आहे. जिंतूर तालुक्यातील सोनापूर येथे, महिलांसह, लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात पाईपलाईनच्या वॉल खाली तासंतास ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. गावात नळ योजना आहे मात्र, नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.