परभणीच्या पूर्णा शहरातील विविध भागातील विद्यार्थी रेल्वे रुळ ओलांडून शाळा– महाविद्यालयात जात आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पादचारी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत असली तरी रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.