गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे परभणीच्या पाथरी येथील ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांना पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.