परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये तापमानात घसरण सुरूच असून, परभणीत तापमानाने आज परत एकदा नीचांकी गाठली असून, काल तापमान 6.6 अंश सेल्सिअस इतका होता. मात्र आज यात तब्बल 7 अंशाची घट नोंद करण्यात आली असून आज तापमान 5.9 अंश इतका नोंद करण्यात आला. यावर्षीचा सर्वात नीचांकी तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे. वाढलेल्या थंडीमुळे परभणीकरांना हुडहुडी भरली असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने थंडीची लाट कायम असण्याचा अंदाज वर्तवला असल्याने परभणीकरांना येणारा दिवसात बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.