परभणीत आजही तापमान 6 अंशाखाली असल्याने परभणीकरांना प्रचंड थंडीचा सामना करावा लागत आहे. सलग दुसऱ्या दिवशी परभणीचे तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढचे काही दिवस तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे, वाढत्या थंडीमुळे परभणीकरांमध्ये हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागातून येणारे दूध विक्रेत्यांनी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय. तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येमध्ये ही घट पाहायला मिळते.